22.1 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeअखेर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; ४०० संतांची हजेरी

अखेर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; ४०० संतांची हजेरी

मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईच्या आझाद मैदानावर होणा-या या भव्य शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता होणा-या या शपथविधी सोहळ्याचे विरोधी पक्षनेत्यांसह, धर्मगुरू, साधू-महंत यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.

४०० संत, महात्म्यांची उपस्थिती
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असून राजधानी मुंबईमध्ये अनेक बडे नेते दाखल होत आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून ४०० संत महात्म्यांना बोलवण्यात आलेले आहे. वेगवेगळे पंथ आणि पद्धतीचे उपासक या मेळाव्यासाठी आलेले आहेत त्यातले काही लोक हे व्यासपीठावरती बसणार तसेच काही खाली बसणार आहेत.

शिंदे गटातील संभाव्य मंत्री
महायुतीमध्ये आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी होणार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वगळता आज कुणाचाही शपथविधी होणार नाही असं शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्यात आले आहे. दोन दिवसांनी म्हणजेच सात डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यापैंकी शिंदेंच्या शिवसेनेतील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR