27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत

अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत

छगन भुजबळांच प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, अर्थखात्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. अजित पवार निवडणूक लढविणार, मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी ७८ वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात, वय आहे ते तो काही मुद्दा नाही, असे भुजबळ म्हणाले.
सरकार सर्वांचे पैसे देणार, जशी पुंजी जमा होते तसे देणार आहे. उशीर होणे हे काही नवीन आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळातही उशीर होत होता, प्राध्यान्य कशाला हे ठरवले जाते, असे भुजबळ म्हणाले.

तसेच महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये. विरोधकांना खाद्य देऊ नये, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तशा सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR