24.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना धक्का;पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी केला शरद पवार गटात प्रवेश

अजित पवारांना धक्का;पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी केला शरद पवार गटात प्रवेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह २० माजी नगरसेवकांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या माजी नगरसेवकांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार गटात प्रवेश केला असून विलास लांडेही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत आज मोदी बाग या पवारांच्या निवासस्थानी अजित गव्हाणे यांनी आपल्या सहका-यांसह शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली. यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे.

ज्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यामध्ये अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR