23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरअड्डपालखी महोत्सवात विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्य, लेझीमच्या डावांनी वेधलं लक्ष

अड्डपालखी महोत्सवात विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्य, लेझीमच्या डावांनी वेधलं लक्ष

सोलापूर : शहरातून श्री आदी जगद्‌गुरू पंचाचार्य अड्डपालखी महोत्सव व श्री शिवयोगी, शिवाचार्य भावचित्र मिरवणूक, श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथदिंडीची सवाद्य मिरवणूक निघाली. डोक्यावर श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ, जागोजागी होणारी पुष्पवृष्टी आणि मुखी ओम नमः शिवायचा गजर अशा वातावरणात भक्त सहभागी झाले.

मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या महादेव नृत्याने लक्ष वेधून घेतले.धनगरी ढोल, एसव्हीसीएस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महादेव नृत्य, लेझीम सादर करून वातावरण आणखी भक्तीमय बनले होते. दुपारी बारा वाजण्याच्या वीरतपस्वी मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत समाजातील विविध मान्यवर सहभागी झाले होते.श्री जगदगुरू पंचाचार्य युगमानोत्सव व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अहुपालखी काढण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून भक्तिगीतांच्या संगीतावर मिरवणुकीस
प्रारंभ झाला.

श्री शिवयोगी शिवाचार्य भावचित्र मिरवणूक श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथदिंडी या मिरवणुकीत सहभागी होते. बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर ते अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिर कार्यक्रम स्थळापर्यंतचे पाच किलोमीटर अंतर श्रीमद काशी जगद्‌गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी हे पदयात्रा करत मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी काशी जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. मिरवणुकीत बाळीवेस ते श्री वीरतपस्वी मंदिरापर्यंत पायी चालत आले. या मिरवणुकीत परळी येथील महिलांनी सादर केलेले ‘मन्मथ माऊली पावलांचा भक्ती’ या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सहभागी भाविकांच्या गळ्यात वीरशैव धर्माचे प्रतीक असलेले पंचरंगी उपरणे घातले होते.

फुलांनी सजविलेल्या पाच पालखीत श्री आदि जगद्‌गुरू पंचाचार्य यांचे भावचित्र ठेऊन अड्डुपालखी महोत्सव करण्यात आला. मिरवणुकीतील श्री लिं. तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शिल्पकृती मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR