27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्याअदानी लाचखोरीवरून गदारोळ; बँकिंग दुरुस्तीला मंजुरीचे प्रयत्न

अदानी लाचखोरीवरून गदारोळ; बँकिंग दुरुस्तीला मंजुरीचे प्रयत्न

संसदेचे अधिवेशन सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी लाचखोरी प्रकरणावरून संसदेत गदारोळ उडाला. त्यानंतर कामकाज काहीकाळ तहकूब करण्यात आले. यादरम्यान, बँकांमध्ये खाते असलेल्या खातेदारांसाठी मोठी बातमी आहे.

लोकसभेत सध्या प्रलंबित असलेले बँकिंग दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकिंग विधेयक मंजूर केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक २०१४ अंतर्गत, बँक खात्यांसाठी नॉमिनी व्यक्तींची संख्या चार करण्याचा प्रस्ताव आहे. जेव्हा बँकिंग दुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर मंजूर होईल, तेव्हा प्रत्येकाला आपल्या बँक खात्यात ४ नॉमिनेशन करणे अनिवार्य असेल. या विधेयकांतर्गत प्रत्येक बँक खात्यावर नॉमिनी व्यक्तींची मर्यादा वाढवून चार करण्याचा प्रस्ताव आहे, जी सध्या एक आहे.

विधेयकाची खास वैशिष्ट्ये
बँक खातेदाराला प्राधान्याच्या आधारावर नॉमिनी व्यक्तींची क्रमवारी करावी लागेल किंवा ते बँकिंग नियमांनुसार प्रत्येक नॉमिनी व्यक्तीचा हिस्सा ठरवू शकतात. खातेदाराने नॉमिनीचा पर्याय निवडल्यास त्याला पहिल्या, दुस-या, तिस-या आणि चौथ्या नॉमिनीचे नाव ठरवावे लागेल. खातेधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या चार नॉमिनी व्यक्तींना क्रमश: खात्याचे अधिकार मिळतील. चार नॉमिनीच्या हिस्स्याची विभागणी करून, प्रत्येक नॉमिनीला खात्यातील रकमेचा ठराविक हिस्सा दिला जाऊ शकतो. यामध्ये प्राधान्याची गरज भासणार नाही आणि प्रत्येक नॉमिनीला खात्यातील रक्कम, व्याज इत्यादींचा निश्चित हिस्सा मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR