जालना : प्रतिनिधी
राज्यात कोणालाच उमेदवारी जाहीर केलेली नाही. २९ तारखेनंतर काय निर्णय व्हायचा तो होईल. इच्छुकांची गर्दी वाढली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी जास्त येते आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले, आमचा घोंगडीखाली हात गुंतलेला आहे, असे विरोधक आम्हाला सांगत आहेत. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाची मने जिंकावी लागतात, तेव्हा सत्ता येते. काही मंत्री, माजी खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत.
जरांगे पाटील यांना गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. याबाबत जरांगे-पाटील म्हणाले की, सरकार जुनी प्रकरणे उकरून काढत असून, नोटीस बजावत आहे.