मुंबई : प्रतिनिधी
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी १४ महिने तुरुंगात असताना त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र कसे रचण्यात आले होते याची माहिती देणारे एक पुस्तक लिहिले.या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. ते मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये असेल. ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ असे या पुस्तकाचे नाव असेल.
आपल्याविरुद्ध कोणी व कसे षडयंत्र रचले व आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कसे प्रयत्न झाले, आपल्याला व आपल्या कुटुंबाला कसा त्रास देण्यात आला, याची सगळी माहिती पुस्तकात असेल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठीच्या प्रयत्नात सामील होण्यास मी नकार दिल्याने मला खोटया गुन्हात अडकवून १४ महिने तुरुंगात कसे ठेवण्यात आले या संपूर्ण षडयंत्राबद्दलची माहिती या पुस्तकात असेल असे त्यांनी म्हटले आहे.