कुनार : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही देशांच्या सीमेवर आणखी तणाव वाढला होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशाच्या सैनिकांनी सीमेवर फायरींग सुरु केले होते, हा गोळीबार पूर्व अफगाणिस्तानच्या कुनार येथे झाला. यामुळे तिथेली शेकडो कुटुंबीयांनी आपली घरं सोडली आहेत.
गुरुवारी सीमेजवळील बाजौरमधील सालारझाई भागात हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानने या घटनांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.
सीमेपलीकडून होणारा हिंसाचार हा एक मोठा मुद्दा बनला आहे, गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. सुरक्षेसाठी धोका निर्माण करणा-या दहशतवादी गटांना आश्रय देत असल्याचा आरोप दोन्ही देश करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनारमध्ये झालेल्या गोळीबारामुळे शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. नागरिकांची संख्या वाढत असतानाही, पाकिस्तानी आणि अफगाण अधिका-यांनी या घटनेबद्दल कोणतेही अधिकृत विधान देण्यास टाळाटाळ केली आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.