24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeहिंगोलीअभिनेता गोविंदाच्या रोडशोला कळमनुरीत अल्प प्रतिसाद

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला कळमनुरीत अल्प प्रतिसाद

कळमनुरी : मुजीब पठाण
कळमनुरी येथे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला जुना बसस्थानकपासून सुरुवात झाली. हा रोडशो भाजी मंडई पोस्ट ऑफिस रोड नवीन बस स्थानक मार्गे हिंगोली नांदेड रस्त्यावरून काढण्यात आला.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार संतोष बांगर, शिवसेनेच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह इतर नेते मंडळींची उपस्थिती होती. या रोडशो दरम्यान नवीन बस स्थानकासमोर सर्व नेते मंडळींची भाषणे झाली तर या रोडशोला प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा येणार असल्याने मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु ४०० ते ५०० लोक जमल्याने रोड शो लवकर आटोपण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR