Homeमनोरंजनअभिनेते भरत कपूर यांचे निधन

अभिनेते भरत कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे आज निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांचे निधन झाले. सायंकाळी साडेसहा वाजता कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भावूक झालेल्या अवतार गिल यांनी सांगितले की, आज सायंकाळी साडेसहा वाजता भरत कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून अभिनेत्याची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले होते. ३० एप्रिल रोजी अभिनेत्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच इंटरनेटवर दु:खाची लाट पसरली. चाहत्यांच्या मते, भरत यांचे निधन हे मनोरंजन विश्वासाठी एक मोठे नुकसान आहे. चाहते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करत आहेत.

भरत कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी १९७०, ८० आणि ९० च्या दशकात उत्कृष्ट काम केले. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR