लातूर : प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर शहर वंचित बहुजन विकास आघाडीकडून दि. १९ डिसेंबर रोजी महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.
ज्या भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या देशात संसदीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून भर संसदेत देशाचे गृहमंत्री आर. एस. एस. विचारधारेचे अमित शहा यांनी देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल द्वेशात्मक भावनेने जाणून-बजून अवमानकारक वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी लातूर शहराच्या वतीने गुरुवारी तीव्र निदर्शने करण्यात आले. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहराध्यक्ष सचिन गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाड चे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, युवक प्रदेश सदस्य अमोल लांडगे, जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शेख खलील, विनोद खटके, डॉ. विजय अजणीकर, बौद्धाचार्य केशव कांबळे, जिल्हा सचिव प्रा. प्रशांत उघाडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरेश सूर्यवंशी, प्रचारक सय्यद सुफी साहेब, युवक जिल्हा महासचिव नितीन गायकवाड, कामगार माथाडी जिल्हाध्यक्ष अमोल बनसोडे, लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे, शहर महिला अध्यक्ष सुजाता अजनीकर, शहर महासचिव आकाश इंगळे, ब्लॅक पँथर संस्थापक अध्यक्ष अतुलजी गायकवाड, संस्थापक उपाध्यक्ष उषाताई धावारे, युवक शहराध्यक्ष महिंद्र बनसोडे, शहर सचिव दादासाहेब मस्के, शहर उपाध्यक्ष मनोज लेंढाणे, शहर सदस्य पठाण शरीफ, तालुका उपाध्यक्ष अशोक कांबळे, अॅड. उड्डाण सिंग, अरुण सूर्यवंशी, संजय सुरवसे, प्रसेनजीत कांबळे, शहर सल्लागार राहुल सूर्यवंशी, कमलाकर कवठेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.