लातूर : प्रतिनिधी
अमेरिकन थोरेसिक सोसायटी अर्थात एटीएस ही जगातील नामांकित श्वसनविकार तज्ज्ञांची परिषद असून, या परिषदेच्या वतीने येथील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांना सन्मानीत करण्यात आले आहे. जगातील नामांकित डॉक्टरना या परिषदेत निमंत्रण मिळणे म्हणजे एक प्रकारे प्रतिष्ठेचे समजलें जाते. लातूर येथील डॉ. रमेश भराटे हे मागील दहा वर्षापासून सदस्य असून वेळोवेळी ते या परिषदेला उपस्थित राहत असतात.
या वेळी ही परिषद भारतातील बंगलोर येथे दिनांक ८-९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.या वेळी डॉक्टर भराटे यांचा श्वसनविकार व छातीविकार या विषयातील विशेष योगदाना बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एटीएसचे पदाधिकारी डॉ. मोनिका क्राफ्ट, डॉ. जेरी क्रिश्चानं, डॉ. वीसिया वेदजीचा, डॉ. संजीव कुमार मेहता व भारतातील इतर नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाने लातूर जिल्ह्यातील व परिसरातील डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे.