(लातूर) – ज्ञानराज तबला अकादमी, जामखेडतर्फे ग्रामीण भागातील तबला शिकणा-या मुलांसाठी पुणे येथील युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश पाटील यांच्या तबला वादन कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक ३० मार्च रोजी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रारंभिक ते विशारद परीक्षेमधील अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे तसेच तबल्याचा रियाज, त्याच्या विविध पध्दती तसेच विविध घराण्याचे कायदे, सम-विषम तालामधील रचना व साथ संगत यांसह विविध विषयांवर अविनाश पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
पाटील हे तबला वादनात संगीत अलंकार आहेत तसेच पुणे विद्यापीठाचे एम.ए.तबला वादनातील सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी संपूर्ण भारतासह दुबई, अबुधाबी, नेदरलँड्स, स्पेन, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड, डेन्मार्क, आयर्लंड , स्कॉटलंड व लंडन येथे सोलो तबला वादन सादर करून जगभरातील संगीत रसिकांची दाद मिळवली आहे. सवाई गंधर्व महोत्सव पुणेसह देशविदेशातील अनेक महोत्सवांत पद्मभूषण पंडित राजन साजन मिश्रा, पं. एम. व्यंकटेशकुमार यांच्यासारख्या जागतिक ख्यातीच्या अनेक कलावंतांना साथ संगत दिली आहे. या कार्यशाळेचा सर्व संगीतप्रेमी विद्यार्थी, शिक्षक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अविराज वाटाणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8459703248 या क्रमांकावर संपर्क करावा.