लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य मध विक्री करणा-या विरोधात व अवैध मद्याची वाहतूरक करणा-या विरोधात कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही लातूर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये बाभळगाव रोड वरती वाहनाचा पाठलाग करून करण्यात आली.
सदर कारवाई ही मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई मध्ये २ व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यामध्ये १८ लिटर देशी दारू ४ लिटर विदेशी दारूचा तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली २ वाहने जप्त करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालची किंमत १ लाख ३२ हजार ८० रुपये आहे. सदर कारवाई मध्ये व्ही. ओ. मनाळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उदगीर, दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले, दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, नीलेश गुणाले, जवान संतोष केंद्रे, ज्योतिराम पवार, विशाल सुडके, गीता शेनेवाड, विशाल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

