24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeलातूरअहमदपुरात दूध वाटप करून केले नववर्षाचे स्वागत

अहमदपुरात दूध वाटप करून केले नववर्षाचे स्वागत

अहमदपूर : प्रतिनिधी

सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना अहमदपूर येथे मिथुन फॅन्स क्लबच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दूध वाटप करून नवीन वर्षाचे नाविन्यपूर्ण जोरदार स्वागत करण्यात आले. या दूधवाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी एन. डी. राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर, समाजसेवक सत्यनारायण काळे, लेखक मोहीब कादरी, दादाराव पोळ गुरुजी, अजहर बागवान, शिवाजीराव देशमुख, अभय मिरकले आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनही झाले.

आजकालची तरुणाई काही झाले तरी सेलीब्रेशनच्या मूडमध्ये असते व यामधूनच समाजामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे हे सर्व कमी व्हावे यासाठी मिथुन फॅन्स क्लबच्या वतीने दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दहा वर्षे सातत्याने मिथुन फॅन्स क्लब हा कार्यक्रम अहमदपूर शहरात घेत असते. यावेळी सत्यनारायण काळे, मोहीब कादरी, पीएसआय प्रभाकर अंधोरीकर ,अनिल चवळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज गायकवाड यांनी तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले. या दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन मिथुन फॅन्स क्लबचे मोहम्मद नाजीम, अहमद तांबोळी यांनी केले. या दूध वाटप कार्यक्रमास वेळी शेख सद्दाम, नारायण हिवरे, आनंद हिवरे, हुसेन गुत्तेदार, आसिफ शेख, अलीम शेख, इलाही बागवान, .इशरत कादरी, मोहमद आरेफ.,बालाजी झुंजुलवार.,शेख ईशाद,. वाजिद बागवान, ताजुद्दीन बागवान आदी उपस्थित होते. शहरातील तरुणांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR