अहमदपूर : प्रतिनिधी
आग्रीम पिक विमा व इतर मागण्यासंदर्भात अमरण उपोषण, रास्ता रोको करुनही गंणतंत्रदिनी २६ जानेवारी रोजी विधानसभा मुंबईसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावात १५ जानेवारीपासून गावोगावी एक दिवशीय धरणे आंदोलन करूनही अहमदपूर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात आला नाही. याबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले असून धरणे आंदोलनासह ,अमरण उपोषणाचा इशारा सामाजिक नेते सहदेव होणाळे यांनी दिला आहे.
अहमदपूर तालुक्यातील शेतक-याच्या विविध मागण्याचे निवेदन दि ३० आक्टोबर रोजी देऊनही दाद न दिल्याने ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान अमरण उपोषण करुनही २०२० पासूनचा पिक विमा अद्याप खात्यात जमा झाला नाही तसेच इतर मागणण्यासंदर्भात विचार होत नसल्याने २५ जानेवारीपर्यंत वाट बघून २६ जानेवारीस आम्ही आत्मदहन करणार असे निवेदन देऊनही शासन कसलीही दाद देत नसल्याने १५ जानेवारी २०२४ सोमवारपासून आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात एक दिवशीय ठिया आंदोलन, उपोषण करूनही शासन दखल घेत नसल्याने पुन्हा धरणे असे आंदोलन २४ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहेत.