पक्षशिस्त मोडल्याचा आरोप, सातपुतेंनी केली होती तक्रार
नागपूर : प्रतिनिधी
भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माळशिरस मधील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुंकुद कुलकर्णी यांच्या सहीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांना आठ मुद्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. त्यावर येत्या सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत माढ्यातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपपासून लांब होते. विशेष म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासूनही ते लांब राहिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यात झालेल्या भाजप प्रदेश अधिवेशनाला मात्र त्यांनी हजेरी लावली होती. लोकसभा निवडणुकीनंतर अकलूजमध्ये झालेल्या महाविकास आघाडीतील खासदारांच्या सत्कार समारंभालाही रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माळशिरसमधील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.