आंदोरा येथून गावठी कट्टा दोन काडतुसासह एकजण जेरबंद

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील आंदोरा येथील एका हॉटेलसमोर उभारलेल्या व्यक्तींकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकास जेरबंद केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१२) करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१२) पोलीस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, यांच मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते.

यावेळी ते येरमाळा येथील चौकात पोहचले असता पथकास गोपनिय बातमी मिळाली की आरोपी शाम शिवाजी काळे हा आंदोरा येथे जात पंचायतसाठी आलेला असून तो आंदोरा येथील हॉटेल निसर्ग समोर थांबलेला आहे व त्याचेजवळ एक गावठी कटटा आहे, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या पथकाने सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले. यावेळी सदरील इसम हॉटेल निसर्गचे समोर थांबलेला दिसला. पथकातील स्टाफने तात्काळ गाडीतून उतरून त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गावाबाबत विचारले असता त्याने शाम शिवाजी काळे (वय ३२) रा झगडेगल्ली भूम ता. भूम जि.धाराशिव असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला खोवलेला एक लोखंडी धातुचा त्यास लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी कटटा व त्याचे पँटचे खिशात दोन जिवंत काडतुसे असा ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आले. सदरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याचेविरूध्द पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र वाळगलेप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह/विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक/बबन जाधवर चापोअं/ रोहीत दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44

Latest news