पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोटच्या दोन चिमुरड्या मुलांना आईनेच पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची घटना घडली. या क्रूर महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली.
दरम्यान, पुणे येथील दौंड तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेने पोटच्या दोन मुलांचा खून करत पतीवरही कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आज (८ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. शंभू दुर्योधन मिढे (वय १ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ३ वर्षे) अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे (वय ३५ वर्षे) याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केले आहे.