21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरआज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ

आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आज दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकुण ९ हजार ५३४ अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. आहे.
मतमोजणीच्य प्रक्रियेत लातूर ग्रामीणसाठी १ हजार ६१२, लातूर शहरसाठी १ हजार ७३०, अहमदपूरसाठी १ हजार ६७६, उदगीरसाठी १ हजार ५९६, निलंगासाठी १ हजार ५४४ आणि औसा विधानसभा मतदारसंघासाठी १ हजार ३७६, असे एकुण ९ हजार ५३४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होईल, तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार आहे. उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उदगीर शहरातील देगलूर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार असून निलंगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निलंगा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होईल. तसेच औसा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औसा तहसील कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन येथील लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी कक्षाला भेट देवून पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, रोहिणी न-हे- विरोळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे,  गणेश सरोदे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR