18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयआधारकार्ड अपडेटला मुदतवाढ

आधारकार्ड अपडेटला मुदतवाढ

यूआयडीएआयचा निर्णय, जून २०२५ पर्यंत अपडेट करता येणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने मोठा निर्णय घेतला. यामुळे देशभरातील आधार कार्डधारकांना दिलासा मिळाला. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत आज संपणार होती. १४ डिसेंबर २०२४ ही आधारकार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यूआयडीएआयने ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी पहिल्यांत १४ जून २०२४ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देत ती तारीख १४ डिसेंबर २०२४ पर्यंत आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची एक संधी देण्यात आली. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

यूआयडीएआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार लाखो आधार कार्डधारकांच्या सोयीसाठी १४ जून २०२५ पर्यंत मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा कायम ठेवत असल्याचे म्हटले आहे. ही सुविधा केवळ मायआधार पोर्टलवर उपलब्ध असेल. यूआयडीएआय लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती बदलायची आहे, त्यांच्याकडे आता १४ जून २०२५ पर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे मोफत आधार कार्ड अपडेटसाठी ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR