27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांच्यामुळेच लातूर ग्रामीणचा सर्वांगीण विकास

आमदार धिरज देशमुख यांच्यामुळेच लातूर ग्रामीणचा सर्वांगीण विकास

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे क्रियाशील आमदार धिरज देशमुख यांनी आजपर्यंत लातूर ग्रामीणच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निघी आणला आहे. या निधीतून रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा मोठया प्रमाणात निर्माण करता आल्या. आमदार धिरज देशमुख यांच्यामुळेच लातूर ग्रामीणचा सर्वांगीण विकास झाला आहे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालूक्यातील निवळी व टाकळी (शि.) येथे दि. १२ ऑगस्ट रोजी महिला बचतगटांचे मेळावे झाले. त्याप्रसंगी बचत गटाच्या महलांशी संवाद साधलाता श्रीमती वैशालीताई विलासराव देशमखु बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या संस्थापक सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्यासह डॉ. सारीकाताई देशमुख, सुनिताताई अरळीकर, दैवशाला राजमाने, सीमा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवळी येथील निळकंटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन येथील मंदिर सभाग्रहाचे भुमीपुजन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विशाल पाटील यांच्या निवासस्थानी महिला बचतगटाचा मेळावा घेण्यात आला. गेल्या पाच वर्र्षांत आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी कुटल्या-कुटल्या विकास कामांसाठी निधी दिला. त्याचीही माहिती देऊन श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी  बचतगटांच्या महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या की, आताचे जे सरकार आहे. ते फक्त्त भुलथापा देत आहे. त्याला आपण बळी पडू नये. तसेच सर्व पुरुष मंडळीनी आपल्या गावात झालेल्या विकास कामाची माहिती घरी सांगीतली पाहिजे. जेणे करुन सर्व माता-भगीनींना त्याची माहिती होईल.
कॉग्रेस पक्ष हा सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. ज्यांना कुठे काही अडचणी येत असतील तर सदैव देशमुख परिवार  आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. मोदी यांनी शेतकरी, गोर-गरीब यांना पंधरा लाख रुपये देण्याचे जाहीर केले
होते.
मात्र गेल्या काही वर्षापासून यांनी एकही रुपया दिला नाही. हे सरकार फक्त्त जाहीरात करीत आहे. त्यामुळे  जाहीरातीला बळी पडू नका तसेच आपल्या निवळी गावात काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूकीचा नारळ फुटला असून आता सर्वानी प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
टाकळी (शि.) येथील हनुमान मंदीरात बचत गटांचा महिला मेळावा झाला. यावेळी महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करीत असतानाच लातूर जिल्ह्याला झुकते माप दिले. त्यामुळे लातूर जिल्ह्याने अल्पावधीत विकासाची भरारी घेतली. आता लातूर शहरचे आमदार माजी मंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख हे जिल्ह्याच्या विकासाठी तत्पर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने लाडकी बहिन योजना आणली आहे. पण त्यासाठी महिलांचे बॅक खाते असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांना आपल्या बॅक खात्यात १५०० रूपये अगोदर जमा करावे लागत आहे. हे सरकार फक्त आणि फक्त भुल थाफा देत आहे. त्यामुळे या सरकारच्या भुल थाफांना बळी पडू नये, असे आवाहन  केले.
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनही आहेत. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून त्यांनी महिलांकडून एक रुपायाही न घेता महिलांचे खाते जिल्हा बँकेमार्फत काढून देत आहेत. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लातूर ग्रामीणच्या विकासााचा ध्यास घेतलेले आमदार धिरज देशमुख यांना तमाम मतदारांनी पुन्हा संधी  देऊन धिरज देशमुख यांच्या रुपाने पुन्हा आपल्या हक्काचा आमदार निवडुन आणावा, असे आवाहन केले.
निवळी येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास मंगलताई पाटील, ठकुबाई शिंदे, वैजयंता जगदाळें, हणमंत जगदाळे, विशाल पाटील, अमोल दिवटे, शंकर सगर, रंगनाथ माने आदींसह गावातील नागरीक व बचतगटातील महिला मोठया संख्येने उपस्थितीत होत्या. तर टाकळी (शि) येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास महानंदा काळे, भागेक्षी शेटे, अनिता चव्हाण, कमल शेळके, विलासबाई ढगे, अर्चना कदम, सुर्वणताई कुरकुटे, शिवकन्या दगडे, मंगलताई घाडके, सुदामती ढगे यांच्यासह रामराव ढगे, श्रीनिवास शेळके, निळकंट बचाटे, क्षीनिवास पाटील, नंदकुमार पाटील, संतोष दगडे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR