36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रआम्ही योजनांचे टेकऑफ केले : एकनाथ शिंदे

आम्ही योजनांचे टेकऑफ केले : एकनाथ शिंदे

तेव्हा मी पायलट होतो; फडणवीस,अजित दादा को-पायलट

अमरावती: महायुतीचे सरकार येण्यापूर्वी आपण पाहिलं की अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद पडल्या होत्या, विकास काम ठप्प झालं होतं आणि विकास आणि कल्याणकारी योजणांचं टेक ऑफ झालं. मात्र त्यानंतर विमानाचा पायलट मी होतो आणि को- पायलट देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा होते. मात्र आता देवेंद्रजी पायलट आहे आणि आम्ही दोघे को पायालट असल्याची मिश्किल प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अमरावती येथे विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, राज्यात २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक विकास कामे झाली. मात्र मधल्या काळात अचानक आलेल्या सरकारने पुन्हा काम बंद करण्याचे काम झाले. पण २०२२ साली तुमच्या मनातलं महायुतीचे सरकार आले, तेव्हा पुन्हा या विकासकामांना गती मिळाली.

त्यामुळे अतिशय कमी वेळात आपण अमरावती येथील विमानतळाचे काम ख-या अर्थाने सुरू करू शकलो.

पुढील बोलता शिंदे म्हणाले, पायलटची सीट बदलली तरी विकासाचा विमान हे कायम तेच आहे आणि आम्ही त्याच गतीने समोर जात आहोत. कारण आमचे इंजिन तेच आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई समृद्धी महामार्गचे लोकार्पण होतं असताना अनेकांनी या विकास कामाला विरोध केला. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. तर मी त्या विभागाचा मंत्री म्हणून काम पाहिलं. अनेकांनी विकास विरोधी भूमिका घेतली. मात्र आम्ही ते काम करून हा महामार्ग विकासाचा महामार्ग असल्याचे सिद्ध करून दाखवले. असेही शिंदे म्हणाले.
त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा नव्हता
समृद्धी महामार्गाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांची नेतृत्वात मी रस्त्यावर उतरून काम केलं आणि काम करून दखवले.

मुंबईतील कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, नव्या मुंबईतील विमानतळ असेल असे अनेक विकासकामे आम्ही गेल्या अडीच वर्ष्याचा काळात मार्गी लावले आहे. समृद्धी महामार्गात काही लोकांनी आळमुठी भूमिका घेतली. आधी चे लोक सत्तेत होते त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा पाढा त्यांना पाठ नव्हता. विरोधक अफवा पसरवत आहे, पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. टप्याटप्यामध्ये सर्व योजना सुरू करू. पेपर मिस्टिकवाले आमचे सरकार नाही. हे डबल इंजिन सरकार आहे. गेल्या १० वर्षात ८६ विमानतळ झाली असून आगामी काळात मोदीजींच्या मार्गदर्शनात अजून काम आम्हाला करता येणार आहे. आम्हाला पालघर येथे ही नवं विमानातळ करत असल्याची घोषणा ही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR