30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeलातूरआयएमए व आयएमए महिला विंगतर्फे परिचारिका दिन साजरा

आयएमए व आयएमए महिला विंगतर्फे परिचारिका दिन साजरा

लातूर : प्रतिनिधी
आय. एम. ए. व आय. एम. ए. महिला विंग लातूर यांच्या वतीने मातृदिन, परिचारिका दिनानिमित्त येथील भालचंद्र ब्लड बँक येथे दि. ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित कार्यक्रमात परिचारिका दिन साजरा करण्यात आला.  तसेच मातृदिन निमित्त डॉक्टरांसाठी कविता स्पर्धा तर परिचारिका दिनानिमित्त स्टाफसाठी आरोग्यावर घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी मैत्री फाउंडेशनचे संचालक डॉ धनंजय गायकवाड, संतोष कुलकर्णी, आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, सचिव डॉ. ऋषिकेश हरिदास, आयएमए महिला विंग अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ, सचिव डॉ. प्रियंका डावळे, डॉ रामेश्वरी अल्हाबादे , डॉ आशिष चेपुरे, उपस्थित होते.
  विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आशिष चेपुरे यांनी नर्सिंग स्टाफ यांना मार्गदर्शन केले, तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक डा. ज्योती सुळ यांनी केल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी सूर्यवंशी तर आभार डॉ. ऋषिकेश हरिदास यांनी मानले. यावेळी डॉक्टर, नर्सेस, स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR