25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Home‘आयएसआय’साठी हेरगिरी करणा-या जवानाला अटक

‘आयएसआय’साठी हेरगिरी करणा-या जवानाला अटक

१५ लाखात दिली नकाशा, पोस्टिंगची माहिती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आरोपीकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याद्वारे त्याने ‘आयएसआय’ला गुप्तचर माहिती आणि लष्कराची गुपिते पुरवली आहेत. आरोपीने या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी सांगितले की, आरोपी संदीप सिंहने सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे.आरोपी संदीप सिंह २०१५ मध्ये सैन्यात भरती झाला होता. पटियालामधील सरदुलगड येथील रहिवासी संदीप सिंह त्याच्या साथीदारांसह देशातील अनेक लष्करी छावण्यांबद्दल माहिती गोळा करत आहे आणि ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठवत होता.

पोलिसांनी आरोपीचे तिन्ही मोबाईल फोन जप्त केले आहेत, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. गेल्या दोन वर्षांत संदीप सिंहने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रांस्त्रांची आणि अधिका-यांच्या तैनातीची माहिती आयएसआयला पाठवली होती, असे प्राथमिक तपासात दिसून आले.

आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर पटियालाला आला होता. संधी मिळताच घरिंडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला पटियाला येथूनच अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने अनेक गुपिते उघड केली. यापूर्वी पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपाल सिंहलाही अटक केली होती. आयएसआयच्या सूचनेनुसार, आरोपीने फिरोजपूरमधील एका निर्जन ठिकाणी अमृतपाल सिंहला २ लाख रुपये दिले होते.

दुसरीकडे, अटक केलेल्या अमृतपाल सिंहचा सहकारी राजबीर सिंह नाशिक कॅन्टोन्मेंटमधून पळून गेला आहे. अमृतपाल सिंहच्या अटकेनंतर पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये याबाबत अलर्ट जारी केल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR