32.2 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्र‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा

‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा

कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला. यामध्ये ठाणे येथील बेटिंग चालक हरेश कन्हैयामल वारदनी (वय ४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याला ताब्यात घेऊन दहा जणांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी रोख दोन हजार रुपये, दोन मोबाईल असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नरेश रोहिडा (रा. उल्हासनगर, ठाणे), विकी एन. आर., राहुल बुलाणी, मनीष गिडवाणी, रवी, अमित मोटीजा, किशू खान, मोहित, राजेश छाबरा, सनी आचरा यांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पापाची तिकटी परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये ३८ जणांना ताब्यात घेऊन रोख २ लाख ८० हजार रुपये, २३ मोबाईल असा सुमारे ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले. व्यवसाय मालक, जागा मालक, व्यवस्थापक, खेळ घेणा-यासह तीन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR