मुंबई : भारतीय संघाची स्टार महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिला डिसेंबर 2023 महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पॅट कमिन्सला डिसेंबर 2023 च्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
दीप्ती शर्माने संघाची स्टार खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्ज आणि प्रेशियस मारंज यांना मागे टाकत हा मोठा पुरस्कार जिंकला आहे. दीप्ती शर्माने गेल्या काही काळापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यासाठी तिला आता बक्षीस मिळाले आहे.