27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमुख्य बातम्याआरक्षण संपविण्याचे कॉँग्रेस पक्षाचे कारस्थान : मायावती

आरक्षण संपविण्याचे कॉँग्रेस पक्षाचे कारस्थान : मायावती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू, असे कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगत मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारमध्ये आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही, तेव्हा या पक्षाकडून न्याय न मिळाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. एकंदरीत, जातीयवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आरक्षणाची योग्य घटनात्मक व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी सांगितले.

नेमके काय म्हणाले राहुल गांधी?
दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. सध्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR