27.9 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeलातूरआरोग्य शिबिरात ११२ ज्येष्ठांची तपासणी

आरोग्य शिबिरात ११२ ज्येष्ठांची तपासणी

लातूर : प्रतिनिधी
दरवर्षी १ ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबिरात ११२ ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त्त कार्यालयात आधारवड कृतज्ञता सोहळा झाला. या दोन्ही कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य शिबिरामध्ये  ११२  ज्येष्ठ महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करुन घेतली. या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये रक्त्तदाब, मधुमेह, -हदयरोग इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक हनुमंत किणीकर, अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज कदम, डॉ. गिरी दोन्ही हॉस्पिटलमधील यांच्यासह परिचारिका, फार्मासिस्ट व इतर कर्मचारी आणि समाज कल्याण सहायक आयुक्त्त कार्यालयातील कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश धादगीने होते. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर यावेळी उपस्थित होते. देवसटवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी ज्येष्ठांसाठी शासनाचे अधिनिमय, शासन निर्णयाची व ज्येष्ठांच्या योजनाची माहिती दिली.
समाज कल्याण सहायक आयुक्त्त शिवकांत चिकुर्ते, दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग  ज्येष्ठ नागरिक संचाचे अध्यक्ष दामोदर थोरात, सचिव जगदीश जाजू, दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या महिला आघाडी अध्यक्ष माया कुलकर्णी, लातूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी.जोशी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण धायगुडे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR