दमदार सुरुवात, भारताला मिळाले २ रौप्यपदक
आईची नागोया : वृत्तसंस्था
जपानमध्ये होत असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचे खाते उघडले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदार्स विनोद यांच्या संघाने रौप्यपदक पटकावले. यासोबतच एलावेनिल वलारिवनने वैयक्तिक स्पर्धेत आणखी एक रौप्य पदक पटकावले. २ रौप्यसह भारताने दमदार सुरुवात केली.
१० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत १८९८.० गुणांची कमाई केली. चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले तर जपानने १८९७.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत सोनम मस्कर ही भारताची सर्वाधिक गुण मिळवणारी खेळाडू ठरली. तिने वैयक्तिक पात्रता फेरीत ६३४.१ गुणांसह चौथे स्थान मिळवले. एलावेनिल वलारिवनने ६३३.५ गुणांची नोंद करत चौथे स्थान पटकावले.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. भारताने १८९८.० गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. जपानने १८९७.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले. दक्षिण कोरियाचा संघ शेवटपर्यंत पदकाच्या शर्यतीत होता. मात्र, चू येओन-ब्योलच्या अंतिम फेरीतील कामगिरीमुळे कोरियाला मोठा फटका बसला. कोरियाचा अंतिम स्कोर १८९५.८ राहिला आणि त्यामुळे त्यांना पदकापासून दूर राहावे लागले.
पदक विजेते संघ
चीन : १९०४.२ गुण : सुवर्ण
भारत : १८९८.० गुण : रौप्य
जपान : १८९७.१ गुण : कांस्य
भारत सहाव्या स्थानावर
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सध्याच्या पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे. चीनने आतापर्यंत ७ पदकांसह अव्वल स्थान पटकावले. जपान ५ पदकांसह दुस-या स्थानी, मकाऊ, दक्षिण कोरिया आणि कझाकस्तान हे देशही भारताच्या पुढे आहेत. ४३ क्रीडा प्रकारांमधील ४६९ पदकांसाठी भारताने एकूण ५०१ क्रीडापटू पाठविले आहेत.
सुचिका तारियालने
पदक केले निश्चित
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले पदक निश्चित करणारी खेळाडू मिश्र मार्शल आर्टस फायटर सुचिका तारियाल ठरली. महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत तिने कांस्यपदक निश्चित केले. त्यामुळे तिच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
सुवर्णपदकासाठी महिला
क्रिकेट संघ लढणार
एशियन गेम्सच्या फानयनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. सुवर्णपदकासाठी २२ सप्टेंबरला हा सामना होणार आहे. भारताने आज बांगला देशचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे सुवर्णपदक कोण जिंकणार, याकडे लक्ष असणार आहे.
















