18.6 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeसोलापूरइंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषेतून शिक्षण घेण्याचे पर्याय

इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषेतून शिक्षण घेण्याचे पर्याय

सोलापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मधील शिफारसी आणि तरतूदींचा विचार करून, पदविका तंत्रशिक्षणाच्या नवीन अभ्यासक्रम K Scheme  मध्ये त्यांचा अंतर्भाव केला आहे. पारंपारिक शिक्षणाचे महत्त्व कायम ठेवून MSBTE ने अभ्यासक्रमात बदल तर केलाच सोबत लवचिकतादेखील आणली. ज्यामुळे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीचे आणि बदलत्या काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञानाचे भान विद्यार्थ्यांना येईल आणि अशा वेगाशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमतादेखील विकसित होईल.

आपल्याकडे नेहमीच परदेशातील शिक्षण पद्धतीचे आणि व्यवस्थतेचे कौतुक केले जाते. परदेशातील शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये असलेली लवचिकता आपल्याकडे नसल्याची तक्रार नेहमीच केली जाते. पण MSBTE ने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यात लवचिकता आणली आहे आणि त्यांचे हितदेखील लक्षात घेतले आहे. यामुळे डिप्लोमा अभियंता हा अष्टपैलू होण्यास मदत होईल.

जगभरातील अनेक शिक्षण तज्ञांनी शिक्षणासाठी मातृभाषा ही सर्वोत्तम असल्याचे वारंवार सांगितले आहे, मातृभाषेतून घेतलेले शिक्षण समजण्यास सहज आणि सोपे असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. MSBTE ने या नवीन अभ्यासक्रमात पदविका तंत्रशिक्षण मराठी आणि हिंदी भाषेत शिकण्याची तरतूद केली आहे. त्यामुळेच MSBTE च्या डिप्लोमा अभ्यासक्रमातील विविध विषय हे मराठी आणि हिंदी भाषेत देखील विद्यार्थ्यांना शिकता येतील,

मुळातच तंत्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्याथ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणि क्षमता निर्माण करण्याचा असतो. हे क्षेत्र तंत्रज्ञानातील कौशल्या संबंधित असून ज्यात समस्या सोडवणे, नव निर्मिती आदी गोष्टींचा समावेश असतो. यासाठी भाषा हा अडथळा असू नये याचा विचार करून तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी आणि हिंदी भाषामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.MSBTE ने इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषेतून शिक्षण घेण्याचे पर्याय दिले आहेत. विद्यार्थी त्यांना हव्या त्या भाषेत अभ्यासक्रम शिकू शकतील त्याच बरोबर त्याची परीक्षा द्विभाषिक देऊ शकतील म्हणजेच विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार मराठी- English  किंवा हिंदी- English  या द्विभाषेत परीक्षा देऊ शकतील.

तंत्रशिक्षण घेण्याची आवड असलेले पण इंग्रजी भाषेच्या भीतीपोटी त्यापासून दूर राहणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या  K Scheme  अभ्यासक्रमातील मराठी आणि हिंदी भाषेतून शिक्षण घेण्याची तरतूद ही अधिक सर्वसमावेशक आहे आणि ही तरतूद अधिकाअधिक विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षण एक करिअर म्हणून आता उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच आपण म्हणू शकतो, आला भाषेचे नसेल बंधन, सर्वांसाठी पदविका तंत्रशिक्षण’ अधिक माहितीसाठी संपर्क साधा  www.msbte.org.in किंवा www.dte.maharashtra.gov.in

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR