37 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeसोलापूरशिक्षिका वंदना ताटे पुरस्काराने सन्मानित

शिक्षिका वंदना ताटे पुरस्काराने सन्मानित

सोलापूर : “नवी दिशा नवे उपक्रम” या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा २०२४ राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल सहकारनगर, पुणे येथे पार पडला.

या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले.तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या ” शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे”या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.यावेळी सोलापूर शहरातील सेवासदन प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.वंदना अरविंद ताटे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास . शुभांगी चव्हाण- उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या.तर माजी उपमहापौर महानगरपालिका पुणे आबा बागूल हे प्रमुख पाहुणे होते. संचालक, राहुल रेखावार , सहसंचालक डॉ .शोभा खंदारे आणि . माणिक देवकर – क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. ‌.देवराव चव्हाण , .बळीराम जाधव आणि .आयुब शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व उत्कृष्ट असे नियोजन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR