26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeउद्योगईव्ही निर्मात्या कंपन्यांचा बाजार मंदावणार!

ईव्ही निर्मात्या कंपन्यांचा बाजार मंदावणार!

रेयर अर्थ । चुंबक तुटवड्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनात घट; बजाज ऑटो, टीव्हीएस, अथर एनर्जीवर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीनने रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम आता भारतातील ईव्ही कंपन्यांवर दिसतो आहे. बजाज ऑटो, अथर एनर्जी आणि टीव्हीएस मोटर कंपनी सारख्या कंपन्यांना चीनमधून येणा-या या विशेष चुंबकांच्या तुटवड्यामुळे उत्पादन कमी करावे लागू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हे चुंबक हेवी रेअर अर्थपासून (एचआरई) बनवलेले असतात. त्यांचा पुरवठा चीनमधून केला जातो, मात्र गेल्या चार महिन्यांपासून ही समस्या आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ मंदावण्याची शक्यता आहे. चीनने या चुंबकांच्या निर्यातीसंदर्भात काही नियम केले आहेत.

बजाज ऑटो ही इलेक्ट्रिक दुचाकींची दुसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. एका वृत्तानुसार, कंपनी आपले अर्ध उत्पादन कमी करू शकते. बंगळुरूची अथर एनर्जीही आपल्या उत्पादनात ८ ते १० टक्क्यांनी कपात करण्याची योजना आखत आहे. टीव्हीएस मोटर कंपनीची विक्री गेल्या तीन महिन्यांपासून सर्वाधिक आहे. पण आता त्यांनाही उत्पादन कमी करावे लागू शकते.

तथापि, ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कारण त्यांनी आधीच भरपूर चुंबकांचा साठा करून ठेवला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने सांगितले की, रेअर अर्थ मॅग्नेट्समुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. ओलाकडे पाच ते सहा महिन्यांपर्यंत या चुंबकांचा साठा आहे. कंपनी पुरवठा साखळीच्या इतर पर्यायांवरही काम करत आहे. े.

ओलावर कमी परिणाम होण्याचे एक कारण म्हणजे कंपनीची कामगिरी थोडी कमकुवत राहिली आहे. जूनमध्ये ओला इलेक्ट्रिक सलग दुस-या महिन्यात तिस-या स्थानावर घसरली होती. या चार कंपन्यांचा (बजाज, एथर, टीव्हीएस आणि ओला) मोठा मार्केट शेयर आहे. दर दहापैकी आठ इलेक्ट्रिक दुचाकी याच कंपन्यांच्या आहेत.

इंजिनसाठी आवश्यक चुंबक
एचआरई चुंबकांचा तुटवडा या तिन्ही कंपन्यांना भासत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या इंजिनसाठी हे चुंबक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ईव्ही पुरवठा साखळीत समस्या आहेत. चुंबकांची उपलब्धता ही मोठी समस्या आहे. हे आव्हान पेलण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे टीव्हीएस मोटरच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR