27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्या‘ईव्हीएम’वर आरोप करु नका; काँग्रेसने आता बदलली रणनीती

‘ईव्हीएम’वर आरोप करु नका; काँग्रेसने आता बदलली रणनीती

पक्षांतर्गत उणीवा, फॅक्ट चेकवर भर देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. हरियाणातील निवडणुकीच्या निकालात मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची भेट घेतली. मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम हॅक झाल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. त्यामुळे २० जागांच्या निकालात फेरफार झाल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र आता हरियाणामधील पराभवानंतर काँग्रेसने अचानक आपली रणनीती बदलली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन कोणतीही टीका करणार नसल्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगावर आरोप करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमला लक्ष्य करण्याऐवजी पक्षाला आता अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हरियाणात विजयाच्या जवळ जावून देखील तो मिळवता न आल्याने काँग्रेस आता पक्षातील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी ईव्हीएमवर आरोप केले होते आणि निवडणुकीचे निकाल चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसच्या रणनीतीकारांनी ठरवले आहे की ते पुरेशा पुराव्याशिवाय ईव्हीएमवर हल्ला करणार नाहीत.

हरियाणातील पराभवावर काँग्रेस पक्षाने गुरुवारी आढावा बैठक बोलावली होती. पक्षांतर्गत गटबाजी आणि इतर चुका दूर करण्यावर आता पक्ष भर देणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. तसेच ईव्हीएम छेडछाडीचे ठोस पुरावे मिळेपर्यंत आपण हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत आणि पक्षातील अंतर्गत उणिवा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या हायकमांडने म्हटले. गुरुवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयातून यासंदर्भात एक पत्र जारी करण्यात आले आहे. पक्षाने एक तांत्रिक टीम तयार केली आहे जी ईव्हीएम आणि मतदानाबाबत उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची तपासणी करेल आणि ख-या उणिवा शोधून काढेल, असे या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR