मुंबई : प्रतिनिधी
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज विधान भवनात मोबाईल हरवला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध सुरू आहे. सर्व व्यवस्था सामंतांचा मोबाईल शोधण्यात व्यस्त आहे. विधान भवनाच्या लॉबीसमोर गर्दी होती. या गर्दीतून त्यांचा मोबाईल गायब झाल्याचे सांगितले जात आहे.
याआधीही उदय सामंत यांचा मोबाईल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हरवला होता. त्यावेळी व्यासपीठावरून जाहीर करावे लागले होते. त्यामुळे उदय सामंत यांचाच मोबाईल सारखा सारखा का हरवतो, याची चर्चा राज्यभर सुरू आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात अशी घटना घडली होती आणि ती पण उदय सामंत यांच्यासोबत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला. त्यामुळे व्यासपीठावर काहीकाळ गोंधळाची स्थिती पहायला मिळाली. मोबाईल परत करावा यासाठी थेट व्यासपीठावरून जाहीर करावे लागले. मात्र काही वेळातच सामंतांचा मोबाईल मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र भर कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समक्ष मोबाईल हरवल्याची चर्चा राज्यभर सुरू होती.