24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये होतील सामिल

उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये होतील सामिल

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी आमदार रवी राणा यांनी आपल्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. अवघ्या १५ दिवसांत शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सरकार स्थापन करतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

राणांचा हा दावा खरा ठरला तर तो इंडिया आघाडीला मोठा धक्का असेल, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना अधिक महत्व दिले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नुकतेच एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.या क काही एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. उबाठाला ९-१४ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.

एक्झिट पोल समोर आल्यानंतर राणांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय दूरदृष्टीमुळे माहित आहे की, त्यांना सध्याच्या काळात राजकीय समृद्धी हवी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्रयाला यावे लागेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि मोदी एका मंचावर दिसतील असेही राणा म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR