सोलापूर: उर्दू ही अदब तहजीब शिकविणारी गोड भाषा आहे म्हणजे उर्दू. ही सु सस्कृत भाषा आहे परंतु खेदाने म्हणावे लागते कि आम्ही उर्दूच नीट बोलत नाही , त्यामुळे आपल्यात सु- संकृतपणाचे लक्षण दिसून येत नाही. उर्दू भाषा ही मधुर आहे , म्हणजेच आपल्यातला राग आहे .मनातला द्ववेश आहे आपण स्वतः संपवून टाकले पाहिजे आणि हीसुरुवात स्वतः पासून सुरु केली तर भाषेतली सुंदरता – तहजीब दिसून येईल असे मत प्रा डॉ शफी चोबदार यांनी शमा शाळेत उर्दू दिवसाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून व्यक्त केले .
ते पुढे म्हणाले – अशा कार्यक्रमात नेहमी पाहुणे येतात आपले मत व्यक्त करून जातात परंतु शमा शाळेतील मुला मुलींनी आम्हास कविता , उर्दू शायरी ऐकवली ‘ हाच खरा उर्दू दिवस साजरा झाल्याचे वाटते .
या वेळी उर्दू चे दिवंगत कवी मुनव्वर राणा , राहत इंदोरी , अशहर इकबाल , तसेच लता हया , शबीना अख्तर , निकहत नसीम , चांदनी शबनम , सबीहा बल रामपूरी यांच्या वेशभुषेत त्यांचा कविता शमा शाळेतील मुला मुलीनी सादर करून वाह . वाह मिळविली .
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी , इकबाल अन्सारी , मुनाफ शेख , माजी मुख्यध्यापक कुद्दूस नल्लामंदू , उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले . संस्थेचे अध्यक्ष अय्यूब नल्लामंदू यांनी सर्वांचे शाल बुके देऊन सत्कार केले नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करत शाळेस तीन संगणक भेट देण्याची ग्वाही दिली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाहीन सदफ यांनी केले तर आभार आसीया बिजापुरे यांनी मानले .