24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीएआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या कार्यकारणीवर राजकुमार भांबरे विजयी

एआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या कार्यकारणीवर राजकुमार भांबरे विजयी

परभणी : ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) मॅनेजमेंट कमिटी मेंबर २०२४-२५ साठी मॅनेजमेंट कमिटी मेंबरची निवडणुक झाली. या निवडणुकीत परभणी येथील कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे हे मराठवाड्यातून एकमेव उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.

देश पातळीवरील कर सल्लागार संघटनेच्या वर्ष २०२४-२५ करीता नुकत्याच निवडणुका पार पडल्या. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. एआयएफटीपी वेस्टन झोनच्या मॅने्जिंग कमिटीवर परभणी कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे हे भरघोस मतांनी विजयी झाले. महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यातून ४० जण निवडून आले. यामध्ये मराठवाड्यातून कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे हे एकमेव आहेत. एआयएफटीपी ही कर सल्लागाराची संस्था गेल्या ५० वर्षापासून कार्यरत आहे. मागील २० वर्षापासून महाराष्ट्र एआयएफटीपीसोबत व जीएसटी पीएएम मुंबई यांच्यासोबत कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे काम भांबरे करत आहेत.

या विजया बद्दल परभणी कर सल्लागार संघटना सीपीई चॅप्टर परभणी तर्फे आर.एस. भांबरे यांच्या स्टेशन रोडवरील पद्मावती टॉवर कार्यालयात राजकुमार भांबरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परभणी सीपीई चॅप्टरचे सी.ए. संतोष इंगळे, सी.ए. प्रशांत काबरा, सी.ए. कुशल गंगवाल, सी.ए. रोहित मंत्री, सी.ए. श्याम धुत, कर सल्लागार संघटनेचे अ‍ॅड. लाटकर, सत्येन गुंडलवार, सीए राहुलवार, अ‍ॅड. श्रीकांत सोनेसांगवीर, सीए हिमांशू शहा, गोपाल मुरक्या आदींची उपस्थती होती. तसेच परभणी शहरातील मित्र परीवार संदीप भंडे, दिपक जपे, महेश सोणी, संतोष गायकवाड आदिंसह सर्व स्तरातून भांबरे यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR