34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरएकाच दिवसात सहा टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म!

एकाच दिवसात सहा टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म!

लातूर : प्रतिनिधी
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अपत्यसुखापासून वंचित दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरणा-या येथील के. जी. एन. टेस्टट्युब बेबी हॉस्पिटल  येथे एकाच दिवशी तब्बल सहा टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म झालाआहे. हा क्षण संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद असून, वंध्यत्वावर मात करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातआहे.
‘वंध्यत्वाकडून – मातृत्वाकडे’ या ब्रीदवाक्याला नेहमी खरे करण्याचा ध्यास डॉ. आमिर शेख यांनी घेतला आहे. आयव्हीएफ उपचाराद्वारे अपत्यप्राप्तीचा आनंद घेऊ इच्छिणा-या जोडप्यांसाठी केजीएन हॉस्पिटल एक विश्वासार्ह केंद्र बनलेआहे अपत्य प्राप्तीसाठी संघर्षक रणा-या जोडप्यांसाठी आयव्हीएफ (इन-विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान मोठा वरदान ठरत आहे. या प्रक्रियेद्वारे जन्मलेली ही सहा बाळं त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आहेत.  या नवजात बाळांचे कुटुंबीय आपल्या आनंदाला शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. ‘आम्ही अनेक वर्षे मातृत्वासाठी संघर्ष केला. के जी एन हॉस्पिटलमुळे आमचे स्वप्न पूर्णझाले. आम्ही कायमच या हॉस्पिटलचे ऋणी राहू’, असे एका नवजात बाळाच्या आईने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR