24.6 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeलातूरएसटी कर्मचा-यांच्या माणुसकीचा प्रवाशास दिलासा

एसटी कर्मचा-यांच्या माणुसकीचा प्रवाशास दिलासा

लातूर : प्रतिनिधी
नाही म्हणले तरी मानवी स्वभाव लालसेपुढे बहुतांश वेळा नतमस्तक होतो. लालसेने नेहमीच मानसांचा पराभव केल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. परंतु, लालसेचा पराभव माणसाने केल्याचा प्रसंग येथील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी घडला.
श्रीमती परिहार लातूरहून अहमदपूरला एम. एच. २० बी. १८२८ या क्रमांकाच्या एस. टी. बसने निघाल्या आणि त्या अहमदपुर बसस्थानकावर उतरल्याही. परंतू, विसरुन त्यांची बॅग बसमध्येच राहिली. बसचे वाहक संगमेश्वर घुमे (वाहक क्रमांक ९०११) यांना सदर बॅग विसरुन राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी ती बँग परतीच्या प्रवासात पुन्हा लातूरला आणली. दरम्यान श्रीमती परिहार यांचा मुलगा ओमकार परिहार याने वाहक घुमे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधुन एस. टी. मध्ये बॅग विसरल्याचे सांगीतले. तेव्हा घुमे यांनी ओमकार परिहार यांना मध्यवर्ती बसस्थानकात बोलावून घेतले.
ओमकार  आल्यानंतर बॅगमध्ये काय काय  आहे, अशी विचारणा केली. बॅगमध्ये जे जे  आहे ते ते परिहारने सांगीतल्याने बॅग परिहार यांचीच असल्याची खात्री पटली.  त्या बॅगेत तीन ड्रेस, तीन साड्या व महत्वाचे म्हणजे २० हजार ८९५ रुपये रोख होते.  त्यानंतर अहमदपूर  आगाराचे वाहक संगमेश्वर घुमे (वाहक क्रमांक ९०११) यांनी स्थानक प्रमुख संतोष बिरादार, वाहतूक नियंत्रक विठ्ठल मंठाळकर, वाहतूक नियंत्रक तुकाराम कराड, चालक माधव गोरले (चालक क्रमांक १८२१६) मध्यवर्ती बसस्थानकातील पोलीस कॉन्स्टेबल एच. व्ही. काटे, बसवराज दुर्गे, श्रीमती शेख, बसस्थानकातील सुरक्षा रक्षक डोळसे, शिंदे यांच्या समक्ष सदर बॅग ओमकार परिहार यांना स्वाधीन करण्यात आली.
एस. टी. महामंडळातील प्रामाणिक कर्मचा-यांमुळे प्रवाशाची विसरलेली बॅग सापडली. एस. टी. कर्मचारी  आपल्या वर्तणुकीतून नेहमीच माणुसकीचा परिपाठ घालून देत आले आहेत. या घटनेमुळे एस. टी. कर्मचा-यांबाबतचा आदर आणखी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. ओमकार परिहार यांनी एस. टी. कर्मचा-यांचें आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR