29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याऑनलाईन गेमिंगवर सर्जिकल स्ट्राईक; ३५७ वेबसाईट ब्लॉक

ऑनलाईन गेमिंगवर सर्जिकल स्ट्राईक; ३५७ वेबसाईट ब्लॉक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्रालयाने परदेशातून संचालित अवैध ऑनलाईन गेमिंग कंपन्यांच्या ३५७ हून अधिक वेबसाईट बंद केल्या आहेत. इतकेच नाही तर या कंपन्याचे देशातील विविध बँकेतील जवळपास २,४०० बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. मंत्रालयाने परदेशी गेमिंग साईटवर जाताना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नामचिन खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी जरी समाज माध्यमांवर या साईटचे समर्थन केले तरी त्याकडे दुर्लक्ष करा असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

७०० परदेशी ई-गेमिंग कंपन्या, वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालयाच्या रडारवर आहेत. या कंपन्यांची नोंदणी नाही. या कंपन्या जीएसटी चुकवत आहेत. या कंपन्या बोगस बँक खात्याआधारे व्यवहार करत असल्याचे समोर आले आहे. या परदेशी कंपन्यांचे भारतातील विविध बँकेतील बोगस खाते धुंडाळून ते जप्त करण्यात आले. या कंपन्या जीएसटी कर चोरी करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकूण २,४०० बँक खाती जप्त करण्यात आली आहे. जवळपास १२६ कोटी रुपये काढण्याच्या प्रक्रियेला रोख लावण्यात आली आहे.

७.५ अब्ज रूपयांचा गेमिंग व्यापार
सरकार आता गेमिंग साईटबद्दल जनजागृती अभियान राबविण्याचा विचार करत आहे. यामुळे युझर्सला भ्रामक दावे आणि खोट्या आश्वासनाचा फटका बसणार नाही. या अहवालानुसार, भारतीय रिअल मनी गेमिंग क्षेत्रात आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२२-२३ पर्यंत वार्षिक २८ टक्क्यांची वृद्धी नोंद करण्यात आली आहे. पाच वर्षांत या क्षेत्राचा महसूल ७.५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR