22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयओडिशात एकाच ट्रॅकवर आल्या 4 ट्रेन...

ओडिशात एकाच ट्रॅकवर आल्या 4 ट्रेन…

भुवनेश्वर : ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाची मोठी घटना समोर आली आहे. येथील लिंगराज स्टेशनवर एकाच ट्रॅकवर चार ट्रेन आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ट्रेन रुळावर उभी असल्याचे दिसत आहे, तर तीन ट्रेन हळू हळू त्याच्या मागून येतात. आता रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे.

यापूर्वी भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. भुवनेश्वरमध्ये सकाळी आठच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR