अमरावती : प्रतिनिधी
‘या हत्येची पद्धत पाहिली तर असे वाटते की, एवढी निर्घृण हत्या कदाचित कोणत्या शत्रूनेही केली नसती. औरंगजेबानेही एवढे क्रूर कृत्य केले नसेल. अशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हीडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
यावर बच्चू कडू यांनी या प्रकरणाला जातीच्या चौकटीतून पाहू नका, असा इशारा देत सांगितले, ही दोन जातींमधील लढाई नाही, तर ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती वाढली कशी? याला खतपाणी घालणारे कोण? याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची नाही का? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.