निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील बस स्थानकात मुक्कामी एस टी महामंडळाची बस क्रमांक एम एच २० बी एल १३३५ ही ८ वाजता लातूरहून वाजता निघून औराद मुक्कामी १०.३० वाजता आलेल्या बसची मागील काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली आहे. सदरील बसचे चालक, वाहक हे विश्रांती निवास येथे जेवण करून गेले होते. त्यानंतर चालक सकाळी उठले असता बसचे मागील काच फुटल्याचे निदर्शनास आले. तात्काळ आगारप्रमुख अनिल बिडवे यांच्याशी त्यांनी संपर्क साधाला असता आगार प्रमुखांच्या आदेशाने औराद पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बस स्थानकात निलंगा आगाराच्या पाच बसेस व स्वारगेट आगाराची एक बस मुक्कामी असते. मागील दोन वर्षात दोनदा बस चोरी, बस पळवणे अशा घटना घडल्या आहेत दि १५ जानेवारी २०२५ रोजी महामंडळाची बसच्या मागील काच फोडण्यात आली. अशा घटना होत असल्याने चालक वाहकार व प्रवाशात भितीचे वातावरण आहे. चालक वाहक व औराद ग्रामस्थाकडून बस स्थानकाला कंपाऊंड व सीसीटीव्ही कॅमे-याची सोय करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बस स्थानकावर कंपाऊंड नसल्याकारणाने अनेक अवैध वाहने, रोडरोमिओकडून संध्याकाळी मुक्कामी असणा-या चालक वाहक व प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे महामंडळाने बसवावेत, अशी नागरिकांचाी मागणी आहे. अधिक तपास पोहेका एस जी चिटबोणे हे करीत आहेत.