निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील तापमान गत सहा दिवसांपासून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांचा जीव कसावीस होत आहे. शुक्रवारी तर येथील उच्चंकी ४४ अंश सेल्सीअस वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यामुळे औराद शहाजानीसह परिसर उच्चांकी तापमानामुळे तापला आहे .
दि ३ एप्रिल रोजी ४२.५ अंश सेल्सीअस होते तर दि ४ एप्रिल रोजी ४३ अंश सेल्सीअस तर दि ५ एप्रिल रोजी ४४ अंश सेल्सीअस उच्च तापमान झाल्याने उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठत शुकशुकाट दिसत असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून तापमानात वाढ होत असून शुक्रवारी औराद शहाजनी येथील हवामान केंद्रावर उच्चंकी ४४ अंश सेल्सियसची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.