28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरऔराद शहाजनीत मातीची तस्करी

औराद शहाजनीत मातीची तस्करी

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील उच्चस्तरीय बंधा-यापासून थोडयाच अंतरावर जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनीतील अवैध रित्या मोठया प्रमाणात मातीची तस्करी केली जात आहे. यामुळे उच्चस्तरीय बंधा-याला धोका होऊ शकतो. म्हणून अवैद्यरीत्या मातीचा उपसा करणा-यावर प्रशासनाकडून तात्काळ आवर घालून अवैध मातीचा उपसा बंद करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या परिसरात वाळू माफिया सोबत माती माफीयाने डोके वर काढल्याने प्रशासनाविषयी नागरिकांतून संताप व्यक्त करत कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील उच्चस्तरीय बंधा-यापासून अगदी थोडयाच अंतरावर जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनीतून नियमबा  गत चार दिवसापासून मोठया प्रमाणात अवैद्यरित्या मातीचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित माती माफियाने जलसंपदा विभागाच्या कर्मचा-यांना माती उपसा करण्याची परवानगी घेतली असल्याचे खोटे सांगत मातीची तस्करी केली असल्याचे शेतक-यातून चर्चिले जात आहे. सदर माती माफिया रात्रीच्या वेळी पोकलेनद्वारे हायवा मध्ये माती भरून मातीची तस्करी करत असून दिवसा मात्र पोकलेन दूरवर उभे केले जात आहे.
 विशेष म्हणजे माती तस्कराने सुट्टीचा अंदाज घेत शनिवारी दिवसभर अवैद्यरीत्या मातीचा उपसा केला. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का ? असा सवाल उपस्थित होतो. जलसंपदा विभागाकडून संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार का ? असे शेतक-यांतून चर्चिले जात आहे. तसेच औराद शहाजानी येथील अवैद्यरीत्या होत असलेला मातीचा उपसा तात्काळ बंद करून अवैद्य माती उपसा करणा-यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. निलंगा तालक्यातील औराद शहाजानीसह परिसरातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहत असल्याने या भागातून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
आता तर वाळू माफिया सोबतच माती माफियाने डोके वर काढल्याने यावर प्रशासन आवर घालणार का असा संताप व्यक्त करत औराद शहाजानीसह परिसरातील अवैधरीत्या होत असलेली वाळू व माती तस्करी प्रशासनाकडून बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR