17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरऔसा येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने निदर्शने

औसा येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने निदर्शने

औसा :  प्रतिनिधी
समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने १४ जुलै २०२४ रोजी विशालगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काहींनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह, मस्जीदीवर तसेच निष्पाप मुस्लिम बांधवावर भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये दर्गाह मस्जिदीचे तसेच मुस्लीम बांधवांच्या घराचे व दुकानांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या भ्याड कृती करणा-या हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी बांधवांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.  विशालगड येथील हजरत मलीक रेहान दर्गा ही सर्व धर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे, येथील हजरत मलीक रेहान दर्गाहवर ंिहंदू, मुस्लीम भाविकांची निस्सीम भक्ती आहे. येथील दर्गाह ही ंिहंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण देशात प्रसीध्द आहे.
गडावरील कांही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबीत असताना आणि ते काढण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी, रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादीय तरुणांनी एकत्र येऊन विशालगडावरील पवित्र दर्गाहवर दगडफेक केली तसेच दंगेखोरांनी विशालगडावरुन परतताना गडाशेजारील गजापूर या गावातील मस्जीद तसेच मुस्लीम लोकांवर आणि त्यांच्या घरावर, दुकानावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लीम लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे न भरुन येणारे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  हे कृत्य अंत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे. यामुळे मुस्लीम बांधवांसह हजरत मलीक रेहान बाबांच्या सर्व भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
गेल्या रविवार ची दुर्दैवी घटना घडल्यापुर्वी साधारण आठ दिवसापूर्वी दि.८ जुलै २०२४ रोजी माजी आमदार नितीश शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली विशालगडवर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडावरील स्थानिक रहिवाश्यांच्या विरुध्द भडकाऊ भाषण देऊन एक प्रकारची चिथावणी देण्याचे काम करण्यात आले होते.  या प्रकरणी माजी आमदार नितीश शिंदे यांना या हल्ल्याचा जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.  या प्रकरणी दिरंगाई दाखविलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी  औसा  तहसीलदारांंना देण्यात आले. यावेळी शहरातील मुस्लिम समाजातील नागरीक  उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR