17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरऔसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

औसा : प्रतिनिधी
औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ४३ कोटींचा निधी मंजूर झाली असून या योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  दि. २ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन करण्यात आले. औसा शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा हा आपला संकल्प असल्याचे सुतोवाच आ अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले आहे.
औसा नगरपालिकेसमोर सदरील योजनेच्या कामाच्या फलकाचे आनावरण आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंंदे, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, शहराध्यक्ष सुनील उटगे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, अक्रम खान, अरंिवद कुलकर्णी, संतोष चिकुर्डेकर, शिव मुरगे,  गोपाळ धानुरे, कल्पना डांगे, प्रदीप मोरे आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, औशाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या इतिहासात जेवढा निधी उपलब्ध झाला नाही त्यापेक्षाही अधिकचा निधी या पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी मंजूर करून आणला आहे. शहरात १४ ठिकाणी अद्ययावत शौचालये उभा करण्याचे काम पुर्ण होत असून क वर्गाच्या या नगरपालिकेच्या विकासासाठी येणा-या आठ दिवसांत आणखी मोठा निधी उपलब्ध केला जाणार आहे. औसा शहरात उभारलेल्या नूतन बसस्थानकाचे लोकार्पणही लवकरच केले जाणार असून या बसस्थानकातून शहरी तर जुन्या बसस्थानकातून ग्रामीण भागात वाहतूक होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औसा शहराच्या तिस-या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून याही कामाचे लोकार्पण लवकरच केले जाईल. ज्या ज्या भागात पाणीपुरवठा होत नाहीकिंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्ये सुधारणात्मक कामे करण्यात येणार आहेत.
औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा, मुख्य रस्ता तिसरा टप्पा, वरिष्ठ स्तरीय दिवाणी न्यायालय, बसस्थानक आणि अंतर्गत रस्त्यांची शेकडो कोटींची कामे पूर्णत्वास गेली आहेत महानगरपालिकेचा दर्जा असलेल्या शहरांमधील नागरिकांनाही मिळणार नाहीत अशा नागरी सुविधा औसा शहरातील नागरिकांना मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR