20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरकठोर परिश्रमाद्वारेच यश प्राप्त होते

कठोर परिश्रमाद्वारेच यश प्राप्त होते

लातूर : प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि कठोर परिश्रम केले तर निर्धारित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवून निश्चित यश प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त निलेश गायकवाड यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावी बोर्ड परीक्षा संबंधी कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते. विचार पिठावर माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, प्रा. वनिता पाटील, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. नितीन वाणी, प्रा. श्रीनंद पाटील, प्रा. केशव सूर्यवंशी, प्रा.  केशव बिराजदार, प्रा. श्रीकांत माळी, प्रा. माधुरी सरपे यांची उपस्थिती होती.
कोलकाता पोलीस आयुक्तालय हे १८५६ मध्ये स्थापन झालेले देशातील सर्वात जुने पोलिस आयुक्तालय आसल्याचे सांगून गायकवाड म्हणाले की, अपारंपरिक गुन्हे, दहशतवाद आणि संबंधित क्रियाकलाप प्रभावीपणे हाताळण्यासाठी हे दल विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामधून मिळणारा अनुभव निश्चितच पुढील जीवनाच्या यशस्वीतेसाठी पूरक ठरणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गवई म्हणाले की, आयपीएस निलेश गायकवाड हे लातूरचे भूमिपुत्र असून नुकतेच ते कोलकाता येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने आपण सन्मान करीत आहोत. यापूर्वी ते पश्चिम बंगाल येथील अलीपुरद्वार जिल्ह्याचे सहायक पोलीस अधीक्षक होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केशव सूर्यवंशी यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव बेंदरगे, सेयाद जलील, राम पाटील, बालाजी डावकरे, कृष्णा कोळी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR