आशियाई क्रीडा स्पर्धा, महिला संघानंतर पुरुष संघाचीही सुवर्ण भरारी
टोकियो : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने कबड्डीत दुसरे सुवर्णपदक जिंकले. भारताच्या महिला संघाने पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर पुरुष कबड्डी संघानेदेखील सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने अंतिम फेरीत इराणला ४०-३४ ने पराभूत केले. अटीतटीच्या सामन्यात भारताने इराणला पराभूत केले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इराण आघाडीवर होता, मात्र, भारताने दुस-या हाफमध्ये दमदार कमबॅक करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
इराणने पहिल्या हाफमध्ये भारतावर १८-१७ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, दुस-या हापमध्ये भारताने २३ गुण मिळवले तर इराणला १६ गुण मिळवता आले. दुस-या हाफमध्ये भारताने इराणला ऑलआऊट केले. यामुळे ते दबावात दिसून आले. भारताने या स्थितीचा फायदा घेतला, याशिवाय भारताच्या पुरुष संघाचा बचाव देखील दमदार होता.
भारताने पटकावले
चौथे सुवर्णपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत चार सुवर्णपदकं मिळवली आहेत. सर्वात पहिले सुवर्णपदक भारताच्या महिला क्रिकेट संघाने मिळवले होते. त्यानंतर नेमबाजी मिश्रमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले. आज महिला कबड्डी संघाने आणि पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या सुवर्णपदकाचा चौकार झाला.
कबड्डीत नववे सुवर्ण
१९९० ते २०२६ दरम्यान १० वेळा आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यापैकी ९ स्पर्धांमध्ये भारताने कबड्डीत सुवर्णपदक मिळवले. २०१८ मध्ये भारताच्या कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळवता आले नव्हते. भारताच्या महिला कबड्डी संघानं देखील अंतिम सामन्यात इराणला ३७-३४ नं पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. हा सामना देखील अटीतटीचा झाला.
भारताच्या खात्यात २८ पदके
भारताने आजपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्णपदकांसह २८ पदकं जिंकली. भारत पदतालिकेत १० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडे ४ सुवर्णपदकांसह ११ रौप्य पदकं आणि १३ कांस्य पदकं आहेत. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०७ पदके जिंकली होती.
















